Other

मुंबईतील जागतिक महापौर परिषदेत जळगावचा सहभाग

महापौर दीपमाला काळे यांनी जाणून घेतले आधुनिक शहर विकासाचे तंत्र

मुंबईतील जागतिक महापौर परिषदेत जळगावचा सहभाग

महापौर दीपमाला काळे यांनी जाणून घेतले आधुनिक शहर विकासाचे तंत्र

जळगाव (प्रतिनिधी) : शाश्वत आणि विकसित शहरांच्या निर्मितीसाठी मुंबई येथे आयोजित ‘थर्ड वर्ल्ड मेयर्स फोरम समिट २०२६’ या जागतिक परिषदेत जळगाव महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला मनोज काळे यांनी सहभाग नोंदवला. या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देश-विदेशातील विविध शहरांच्या महापौरांशी संवाद साधण्याची संधी त्यांना मिळाली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शनही लाभले. या परिषदेतील अनुभवांचा उपयोग जळगाव शहराच्या नियोजनबद्ध, स्वच्छ आणि शाश्वत विकासासाठी होणार आहे.

परिषदेच्या उद्घाटन सत्राला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री तोखन साहू, विविध राज्यांचे मंत्री, मुंबईच्या महापौर रितूताई तावडे, ‘एआयआयएलएसजी’चे अध्यक्ष रणजीत चव्हाण यांच्यासह विविध देशांतील प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात शहरांच्या विकासात महापौर आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले.

शहरे ही विकासाची इंजिने असून सक्षम स्थानिक स्वराज्य संस्था ही विकसित भारताची पायाभरणी आहे, असे प्रतिपादन करत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या नागरी परिवर्तनाचा व्यापक दृष्टिकोन मांडला.

तीन महत्त्वाच्या सत्रांत सहभाग

परिषदेच्या पहिल्या दिवशी महापौर दीपमाला काळे यांनी नागरी विकासाशी संबंधित तीन महत्त्वाच्या सत्रांमध्ये सहभाग घेतला.

‘अर्बन इंडिया @ २०४७’ या सत्रात २०४७ मधील भारतातील शहरांची संकल्पना, भविष्यातील शहरी विकास आणि आधुनिक शहरांच्या उभारणीवर चर्चा झाली.

‘मेयर्स राउंड टेबल टॉक’ या सत्रात विविध महापौरांनी शहरांच्या समस्या, स्थानिक स्वराज्य संस्थांसमोरील आव्हाने आणि विकासाच्या विविध पैलूंवर विचारमंथन केले.

‘शहरी कचरा व्यवस्थापन व सर्क्युलर इकॉनॉमी’ या सत्रात कचऱ्याचा पुनर्वापर, त्यातून उपयुक्त संसाधनांची निर्मिती आणि कचरा व्यवस्थापनासाठी शाश्वत उपाययोजनांबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

जागतिक अनुभव जळगावच्या विकासासाठी उपयुक्त

जागतिक स्तरावरील मान्यवर, तज्ज्ञ आणि विविध देशांच्या महापौरांशी संवाद साधून आधुनिक कार्यपद्धती जाणून घेता आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन आणि परिषदेतील जागतिक अनुभव जळगाव शहराला अधिक स्वच्छ, सुंदर आणि नियोजनबद्ध बनविण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरतील, असा विश्वास महापौर दीपमाला मनोज काळे यांनी व्यक्त केला.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button