Detection

गुंतवणुकीच्या नावाखाली चुना, जळगाव सायबर सेलने उघड केला गुन्हा

महा पोलीस न्यूज । दि.३० एप्रिल २०२५ । जळगाव सायबर पोलिसांनी शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूक करून फसवणूक करणाऱ्या टोळीविरुद्ध मोहीम राबवत आणखी एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात कांजीभाई भिकाभाई जादव, वय ४२, गुजरातमधील वेरावल येथील रहिवासी असलेल्या या व्यक्तीला पोलिसांनी आज ताब्यात घेतले. त्याला न्यायालयाने चार दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दि.२१ ऑगस्ट २०२४ रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यापासून झाली, ज्यामध्ये तक्रारदाराला या कालावधीत मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून फसवले गेले. आरोपींनी स्वतःला मालविया, आदित्य जैन, विजय कुमार अशी नावे सांगत फोन आणि व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधला. त्यांनी “Raise-Pyramid एलिट” नावाच्या काल्पनिक योजनेत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर, गुंतवणूकदारांना मिळालेल्या नफ्यापैकी २० टक्के रक्कम कथित धर्मादाय संस्थांना दान म्हणून द्यावी लागेल, असे खोटे सांगून तब्बल ५३.६५ लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने घेतले. मात्र, नंतर कोणतीही रक्कम परत न करता तक्रारदारांची फसवणूक करण्यात आली.

११.८३ लाख मिळवून दिले परत
तपासादरम्यान असे उघड झाले की, आरोपीने एक बनावट कंपनी उभारली होती आणि बँक खात्यांद्वारे मिळालेली रक्कम “देणगी” म्हणून दाखवून समाजकल्याणाच्या नावाखाली खर्च केल्याचा दावा केला. आतापर्यंत या प्रकरणात सात संशयितांचा समावेश असून, तीन जणांना अटक झाली आहे. तसेच, बँक खात्यांचे विश्लेषण करून तक्रारदाराला ११.८३ लाख रुपये परत मिळवून देण्यात आले आहेत.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन
जळगाव सायबर पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की, सोशल मीडियावर येणाऱ्या शेअर ट्रेडिंगच्या गुंतवणूक संदर्भातील संदेशांवर विश्वास ठेवू नये. फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा व्हॉट्सअॅपद्वारे येणाऱ्या अशा ऑफर टाळाव्या. फसवणूक झाल्यास तत्काळ 1930 या टोल-फ्री क्रमांकावर किंवा Cybercrime.gov.in वर ऑनलाइन तक्रार नोंदवावी. याशिवाय, जळगाव सायबर पोलिस स्टेशनच्या 0257-2229695 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

या पथकाने केली कामगिरी
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश गोराडे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिगंबर थोरात, हवालदार दिलीप चिंचोले, हरून पिंजारी अशांनी केली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button