Politics

महाराष्ट्रात तब्बल १ कोटी ८० लाख नागरिकांनी अद्याप या प्रक्रियेत सहभाग नोंदवलेला नाही

महाराष्ट्रात तब्बल १ कोटी ८० लाख नागरिकांनी अद्याप या प्रक्रियेत सहभाग नोंदवलेला नाही

कुणावरही अन्याय होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने एस आय आर प्रक्रियेसाठी आणखी एकदा मुदतवाढ द्यावी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांची मागणी

जळगाव:- निवडणूक आयोगाने एस आय आर प्रक्रियेसाठी आणखी एकदा मुदतवाढ द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केली आहे.

याबाबत सविस्तर त्या म्हणाल्या की, देशातील काही राज्यांमध्ये ज्याप्रमाणे एसआयआर प्रक्रिया राबवली जात आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातही एसआयआर राबवली जात आहे. सामान्य मतदारांना मॅपिंग व इन्यूमरेन्शन भरण्याची शेवटची तारीख ही १७ ऑगस्ट आहे. बुधवारी निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे की आतापर्यंत १८% मतदारांची प्रपत्रे जमा झालेली नाहीत. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आपल्या महाराष्ट्रात तब्बल १ कोटी ८० लाख नागरिकांनी अद्याप या प्रक्रियेत सहभाग नोंदवलेला नाही. आता फक्त चार दिवस शिल्लक राहिले आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे. या प्रक्रियेत खुप अडचणी आल्या. अनेक ठिकाणी लोकांना प्रक्रिया समजली नाही, अनेक ठिकाणी BLO यांनाही ही प्रक्रिया पूर्णपणे ज्ञात नव्हती. ग्रामीण भागातील परिस्थिती तर आणखी बिकट होती. भारतीय संविधानाने या देशातील नागरिकांना मताचा अमूल्य अधिकार दिला आहे. त्यांचा अधिकार अबाधित रहावा, कुणावरही अन्याय होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने एस आय आर प्रक्रियेसाठी आणखी एकदा मुदतवाढ द्यावी.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button