Social

लक्ष द्या : गणेश विसर्जनाला जळगाव शहरातील वाहतूक मार्गात बदल

महा पोलीस न्यूज । दि.१३ सप्टेंबर २०२४ । शहरात ७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होत असून शहरातील सार्वजनिक, खाजगी, व घरगुती श्री गणेश मुर्तींचे विसर्जन मिरवणुकांसाठी होणारी गर्दी पाहता शहरातील वाहतुक मार्गात बदल करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिले आहेत.

जळगाव ते पाचोऱ्यावरुन येणाऱ्या व जाणाऱ्या एस टी बसेस, अवजड वाहने करीता इच्छादेवी चौकी – डी मार्ट – मोहाडी रोड Y पॉईंट – गायत्री नगर – गणेश घाट – सेंट टेरीसा स्कुल – हॉटेल ग्राप्पेस – मलंगशहा बाबा दर्गा – शिरसोली रोड वरील वाहतुक जळगाव कडे येणा-या व जाणा-या एस.टी. बसेस व इतर सर्व प्रकारचे अवजड वाहने विसर्जन दरम्यान बंद राहील. तसेच जळगाव ते पाचोरा येणारी व जाणारी वाहतुक (हलक्या व मध्यम वाहनाकरीता) – इच्छादेवी चौकी – डि मार्ट – मोहाडी रोड Y पॉईंट – गायत्री नगर – गणेश घाट – सेंट टेरीसा स्कुल – हॉटेल ग्रॅपेस – मलंगशहा बाबा दर्गा – शिरसोली रोड वरील वाहतुक जळगाव कडे येणा-या व जाणा-या सर्व मध्यम व हलक्या वाहनांकरीता मार्ग बंद राहिल.

जळगावकडून पाचोऱ्याकडे जाणा-या कार व मोटार सायकल करीता आकाशवाणी चौक – काव्यरत्नावली चौक – महाबळ चौक – संत गाडगेबाबा चौक – राजे संभाजी चौक (मोहाडी रोड) – गुरू पेट्रोलपंप (G मॉल) – मलंगशहा बाबा दर्गा मार्गे पाचोरा कडे आणि पाचोऱ्याकडून जळगाव कडे येणा-या कार व मोटार सायकलसाठी मलंगशहा बाबा दर्गा – गुरू पेट्रोलपंप (G मॉल) – राजे संभाजी चौक (मोहाडी रोड) – संत गाडगेबाबा चौक – महाबळ चौक – काव्यरत्नावली चौक – आकाशवाणी चौक मार्गे जळगाव कडे पर्यायी मार्ग असणार आहे.

आसोदा- भादलीकडून जळगाव कडे येणा-या व जाणा-या एस.टी. बसेस व इतर सर्व वाहने मंगळवार दिनांक १७ सप्टेंबर २०२४ सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपावेतो या कालावधीत मोहन टॉकीज – गजानन मालुसरे नगर – जुने जळगाव – लक्ष्मी नगर – कालंका माता मंदीर मार्गे – महामार्गावरुन अजिंठा चौक – आकाशवाणी चौक – नविन बस स्टॅण्ड या मार्गाचा वापर करु शकतील. पाचोरा कडून येणा-या जड वाहनांन करीता वावडदा – नेरी – अजिंठा चौक मार्गे जळगांव पर्यायी मार्ग असणार आहे असेही डॉ. रेड्डी आपल्या आदेशात म्हटले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button