Crime
गुजरातमधून आलेल्या तरुणाची अमळनेरमध्ये आत्महत्या; व्हिडीओ कॉलवर प्रेयसीसमोर घेतला गळफास

अमळनेर महापोलीस न्यूज l १५ मे २०२५ l
गुजरातमधून सुमारे ४०० ते ४२५ किमीचा प्रवास करून आलेल्या एका तरुणाने अमळनेरमधील लॉजमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सौरभ शर्मा (रा. अहमदाबाद) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्याविरोधात अहमदाबाद येथे पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सौरभ शर्मा हा तरुण अमळनेर बस स्थानकाजवळील एका लॉजमध्ये थांबला होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या प्रेयसीला व्हिडीओ कॉल केला आणि कॉलदरम्यानच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. ही घटना समजताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.