नाराजीनाट्य : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती

नाराजीनाट्य : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती
मुंबई वृत्तसंस्था ;- सध्या पाल्कमंत्रीपदावरून महायुतीमध्ये वादंग सुरु झाले असून पालकमंत्री पदावरून नाशिकमध्ये महायुतीत रस्सीखेच तर रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत वाद सुरु आहे.
अखेर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे.राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने नाशिक आणि रायगडचं पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. १९ जानेवारी रोजी रात्री उशिरा पत्रक जारी करून हा निर्णय घेण्यात आला.
गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्री करण्यात आले होते. यामुळे दादा भुसे नाराज झाले. तर, रायगडमध्ये अदिती तटकरे यांना पालकमंत्री दिल्याने भरत गोगवले नाराज झाले. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले होते. तसेच रायगडचं पालकमंत्रिपद आदिती तटकरे यांना दिल्याचा निषेध देखील व्यक्त केला होता.पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले यांना डावलून आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद देण्यात आलं. त्यामुळे रायगडमधील शिवसैनिक संतप्त झाले. मुंबई-गोवा महामार्गावर महाड जवळ शनिवारी रात्री उशिरा शिवसैनिकांनी रस्त्यावर टायर जाळून याचा निषेध केला.
दरम्यान, पालकमंत्री पदावरून डावल्यानंतर भरत गोगावले आणि दादा भूसे यांच्यावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली होती.दोनही जिल्ह्यात मोठे नाराजीनाट्य पाहायला मिळाले. त्यामुळे 19 जानेवारीला रात्री उशिरा नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
पालकमंत्री पद डावलल्यांतर दादा भुसे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले, पालकमंत्रिपदी डावलणे अशातला काही भाग नाही. जी जबाबदारी दिली ती पुढे नेणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे काम असते. मला या ठिकाणी जी काही जबाबदारी दिली ती आम्ही पुढे नेऊ असे ते म्हणाले .