मुस्लिम कब्रस्तानात अल खिदमत ट्रस्टतर्फे २५ वृक्षांची लागवड


मुस्लिम कब्रस्तानात अल खिदमत ट्रस्टतर्फे २५ वृक्षांची लागवड
अमळनेर : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अल खिदमत ट्रस्ट, अमळनेर यांच्या तर्फे अमळनेर मुस्लिम कब्रस्तान परिसरात २५ वृक्षांची लागवड करण्यात आली.
या वृक्षारोपण उपक्रमास अमळनेर मुस्लिम कब्रस्तान व ईदगाह ट्रस्टचे हाजी सत्तार भाया सर तसेच अल खिदमत ट्रस्ट अमळनेरचे सदस्य उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
विशेष म्हणजे या उपक्रमात लहान मुलांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. मुलांच्या हातून वृक्षारोपण करून घेत त्यांना झाडांचे आपल्या जीवनातील महत्त्व, पर्यावरणाचे संरक्षण आणि भविष्यातील पिढीसाठी हिरवाई जपण्याची गरज याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
🌱या वृक्षारोपण उपक्रमासाठी आवश्यक २५ झाडे D L Social Foundation तर्फे देणगी स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली.
“आज लावलेले एक झाड म्हणजे उद्याच्या पिढीसाठी दिलेली जीवनाची भेट आहे,” या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. कब्रस्तान परिसर अधिक हिरवागार आणि सुंदर करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.






