OtherEducation

पारदर्शक समुपदेशनातून ९८ शिक्षकांना मिळाली पदस्थापना

पारदर्शक समुपदेशनातून ९८ शिक्षकांना मिळाली पदस्थापना

जिल्हा परिषद जळगावची शिक्षक समायोजन प्रक्रिया यशस्वी; शाळांमधील शिक्षकांची कमतरता भरून निघणार

जळगाव, प्रतिनिधी जिल्हा परिषद जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार सन २०२५-२६ च्या संचमान्यतेनुसार नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रात अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया समुपदेशनाद्वारे पारदर्शक पद्धतीने यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.

या प्रक्रियेत मराठी माध्यमाचे १४ व उर्दू माध्यमाचे १२, अशा एकूण २६ अतिरिक्त शिक्षकांचे समुपदेशनाद्वारे समायोजन करण्यात आले.
तसेच पवित्र पोर्टल टप्पा-१ मधील कन्फर्मेशन राऊंडमध्ये प्राप्त झालेल्या यादीनुसार, मराठी माध्यमाचे ५२ व उर्दू माध्यमाचे २०, अशा एकूण ७२ शिक्षकांना जिल्हा परिषद शाळांमध्ये समुपदेशनाद्वारे पदस्थापना देण्यात आली.

ही संपूर्ण प्रक्रिया शासनाच्या मार्गदर्शक सूचना व नियमांनुसार पारदर्शक, निष्पक्ष आणि समुपदेशनाच्या माध्यमातून राबविण्यात आली. प्रक्रियेदरम्यान शिक्षकांना उपलब्ध रिक्त पदांची माहिती देऊन त्यांच्या पसंतीनुसार व नियमानुसार पदस्थापना व समायोजनाची कार्यवाही करण्यात आली.
या प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद शाळांमध्ये आवश्यकतेनुसार शिक्षक उपलब्ध होण्यास मदत होणार असून, विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

जिल्ह्यातील शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या समन्वयपूर्ण कामगिरीबद्दल प्रशासनाकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button