Other

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात युवक संवाद; NEET घोटाळ्याविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; निष्पक्ष चौकशीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात युवक संवाद; NEET घोटाळ्याविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; निष्पक्ष चौकशीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा

अमळनेर | प्रतिनिधी

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस आणि अमळनेर विधानसभा युवक काँग्रेसतर्फे अमळनेर येथे युवक संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानंतर NEET परीक्षेतील कथित गैरप्रकारांविरोधात पदयात्रा काढून उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम

भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव शांभवी शुक्ला आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा तथा मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या आफरीन सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीपराव पवार होते.

कार्यक्रमाची सुरुवात NEET पेपरफुटी प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर राहुल गांधी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व उपस्थित मान्यवरांनी युवकांना मार्गदर्शन केले.

युवकांना संघटनात्मक संदेश

युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेश दगडू पाटील यांनी प्रास्ताविक केले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव आशुतोष पवार, किरण पाटील आणि तुषार संदानशिव यांनी युवक काँग्रेसच्या आगामी कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस मनोज पाटील, प्रवक्ते संदीप घोरपडे, ज्येष्ठ नेते देवेंद्र पाटील, बी. के. सूर्यवंशी, गजेंद्र साळुंखे, रज्जाक शेख, बन्सीलाल भागवत, मगन पाटील, रावसाहेब पवार, सईद तेली आदींनी युवकांना मार्गदर्शन केले.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या संघटन सृजन अभियानांतर्गत निवड झालेल्या विविध फ्रंटल व सेलच्या अध्यक्षांचा युवक काँग्रेसतर्फे सत्कार करण्यात आला. यामध्ये बन्सीलाल भागवत, भिकाजी पाटील, राकेश पवार, भगवान संदानशिव, रावसाहेब पवार, राजू भाट, जुबेर पठाण, ज्ञानेश्वर कोळी, संदीप बारी आदींचा समावेश होता.

NEET घोटाळ्याविरोधात पदयात्रा

बैठकीनंतर मराठा मंगल कार्यालयापासून तहसील कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाद्वारे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तसेच NEET पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली.

याशिवाय २१ जून रोजी होणाऱ्या NEET परीक्षेसाठी बाहेरगावी परीक्षा केंद्र असलेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना प्रवेशपत्राच्या आधारे मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या कार्यक्रम व आंदोलनात चाळीसगाव विधानसभा अध्यक्ष प्रज्वल राजपूत, पाचोरा विधानसभा अध्यक्ष मनोहर महाले, अमळनेर विधानसभा अध्यक्ष हर्षल जाधव, एरंडोल तालुकाध्यक्ष चेतन पाटील, विकास पाटील, गौरव देशमुख, शुभम शिंदे, माजित तडवी, गोविंद देशमुख, योगेश येवले, भूषण भागवत, तौसिफ तेली, गौरवसिंह चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर महाले यांनी केले तर गौरव देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज पाटील, बी. के. सूर्यवंशी, गजेंद्र साळुंखे, शरद पाटील आणि राकेश पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button