Other

गोदावरी फॉउंडेशनच्या विविध संस्थामध्ये आज स्वातंत्रता दिनानिमीत्त विविध कार्यक्रम

गोदावरी फॉउंडेशनच्या विविध संस्थामध्ये आज स्वातंत्रता दिनानिमीत्त विविध कार्यक्रम

जळगाव — भारताच्या स्वातंत्रदिनानिमीत्त गोदावरी फॉउंडेशनच्या विविध संस्थामध्ये माजी खा. डॉ.उल्हास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण व देशभक्तीपर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ.प्रशांत सोळंके,वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, डॉ. चंद्रया कांते, डॉ. विजय बाविस्कर, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, होमीओपॅथीक महाविद्यालयाचे प्राचार्य विद्यानंद आठवले,फिजिओथेरेपी महाविद्यालय डॉ. जयवंत नागुलकर,गोदावरी नर्सिंग महाविद्यालय प्राचार्य विशाखा गणविर, डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग प्राचार्य शिवानंद बिरादर, डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले इ मान्यवर वैद्यकिय महाविद्यालयाच्या प्रांगणात उपस्थित राहणार आहे, तर डॉ.उल्हास पाटील कृषि अभियांत्रिकी व तांत्रिकीत प्राचार्य डॉ. पुनमचंद सपकाळे,कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे आणि अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक चौधरी यांच्या हस्ते खिर्डीशिवार येथील कृषि हब येथे सकाळी ७.३० मि ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

गोदावरी इग्लिश स्कुल,गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय
तर पी ५१ औद्योगिक वसाहत जळगाव भुसावळ महामार्गावरील गोदावरी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय प्राचार्य डॉ.व्ही एच पाटील,गोदावरी सीबीएसई इग्लिश मिडीयम स्कुल प्रिन्सीपल निलीमा चौधरी, गोदावरी इन्स्टीटयुट ऑफ मॅनेेजमेंट रिसर्चचे संचालक डॉ. प्रशांत वारके, डॉ.वर्षा पाटील वृमेन्स कॉलेज ऑफ होम सायन्स डॉ. कविता देशमुख,डॉ.वर्षा पाटील वृमेन्स कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी संचालिका डॉ. निलीमा वारके, डॉ.उल्हास पाटील विधी व विज्ञान महाविद्यालय डॉ झोपे मॅडम, गोदावरी संगीत महाविद्यालय,गोदावरी लक्ष्मी को ऑप बँक लि. व्यवस्थापकीय संचालक ए टी महाजन गोदावरी सिटी मध्ये ध्वजारोहण करणार असून यावेळी विविध कार्यक्रम सादर केले जाणार आहे.

डॉ.उल्हास पाटील इग्लिश मिडीयम सीबीएसई स्कुल भुसावळ
भुसावळ — डॉ.उल्हास पाटील इग्लिश मिडीयम सीबीएसई स्कुल भुसावळ महेश नगर येथील शाळेच्या परिसरात प्रिन्सीपल अनघा पाटील यांचेसह मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण व विविध देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ.उल्हास पाटील इग्लिश मिडीयम सीबीएसई स्कुल सावदा
भुसावळ — डॉ.उल्हास पाटील इग्लिश मिडीयम सीबीएसई स्कुल सावदा येथील शाळेच्या परिसरात प्रिन्सीपल भारती महाजन यांचेसह मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण व विविध देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button