Other

बालविकास विद्यामंदिरात शाळा प्रवेशोत्सव

बालविकास विद्यामंदिरात शाळा प्रवेशोत्सव

भडगाव( प्रतिनिधी)

उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आज सोमवार, दिनांक १५ जून रोजी शाळांची घंटा पुन्हा एकदा खणखणली. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, बालविकास प्राथमिक विद्यामंदिर येथे आज नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळा प्रवेशोत्सव अत्यंत उत्साहात आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. पहिल्याच दिवशी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांकडून औक्षण करून आणि गुलाबपुष्प देऊन जल्लोषात स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि त्यांच्या मनोरंजनासाठी आज शाळेत चक्क मोटू-पतलू अवतरले होते ! आपल्या लाडक्या कार्टून पात्रांना प्रत्यक्ष शाळेत पाहून चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

मोटू-पतलूंसोबत विद्यार्थ्यांनी खूप धमाल केली. या विशेष प्रवेशोत्सव सोहळ्यासाठी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन, उपाध्यक्ष प्रदीप महाजन, कोषाध्यक्ष साहेबराव महाजन सचिव रोहिणी महाजन, सहसचिव रेखा महाजन, संचालक शिवदास महाजन, प्रकाश बच्छाव आणि अर्जुन माळी यांच्यासह संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ आवर्जून उपस्थित होते. याच सोहळ्याचे औचित्य साधून आमदार सत्यजित तांबे यांच्याकडून शाळेला प्राप्त झालेल्या नवीन पोडियमचे मान्यवरांच्या हस्ते रिबीन
कापून दिमाखदार उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शासनातर्फे मिळणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकांचे आणि खाऊचे (बिस्कीट) वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन सुनीता सूर्यवंशी यांनी केले. चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक वृंद अमोल बिऱ्हाडे, सचिन सोनवणे, अर्चना खांडेकर, सागर महाजन, सुनीता सूर्यवंशी, अंजली सोनवणे, विकास झोडगे, रेखा पाटील आणि सुजाता महाजन तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button